Home ताज्या बातम्या आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान, थेट मतदारांना शिवीगाळ

आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान, थेट मतदारांना शिवीगाळ

आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान, थेट मतदारांना शिवीगाळ Controversial statement of MLA Sanjay Gaikwad, insulting voters directly

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जयपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मतदारांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरत त्यांना शिवीगाळ केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.

बुलढाण्यातील जयपूर येथे बोलताना आमदार गायकवाड यांनी मतदारांवर टीका करताना म्हणाले की, “फक्त मटण, दारू आणि दोन हजारात विकले गेले आहेत.” इतकेच नाही, तर त्यांनी शिवीही हासडली आणि “मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या,” असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचा वादग्रस्त विधानांचा इतिहास आहे. यापूर्वीही त्यांनी विविध मुद्द्यांवरून विधान करून वाद ओढवून घेतले आहेत. मात्र, यावेळी थेट मतदारांना शिवीगाळ केल्याने विरोधकांसह नागरिकांमध्येही तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गायकवाड यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकरणामुळे बुलढाण्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

हे ही वाचा :

ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

Exit mobile version