Junnar /आनंद कांबळे : ग्राहकांना आपल्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची माहिती असेल तरच ग्राहक स्वतः आपल्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतील. प्रश्न सोडविण्यासाठी मध्ये दलाल न घेता संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाऊन भेटा नियमाप्रमाणे आग्रह धरा. नियम बाह्य पैसे देऊ नका. हे स्वराज्य आहे, याची जाण ठेवून वागणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करा आणि सुराज्य निर्मितीत अडथळे आणणाऱ्यांना सविनय मार्गाने दुरुस्त करा. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी जुन्नर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्राहक प्रबोधन कार्यशाळेत व्यक्त केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथील जिजामाता सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी बाळासाहेब औटी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक सदस्य डॉक्टर अशोक काळे, ग्राहक पंचायतीचे जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, महसूल ना तहसीलदार प्रसन्न केदारी, निरीक्षक अन्न व भेसळ संतोष सावंत, निरीक्षक वजन माप शास्त्र खाते राजेश बोरभळकर, महावितरण चे उपकार्यकारी अभियंता सुनील डोंगरे, रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील गुंजाळ, चुनर तहसील निरीक्षक अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी, पुरवठा निरीक्षक दीपक मडके, ग्राहक पंचायतीचे तालुका सहसंघटक संतोष नेहरकर, ग्राहक पंचायत महिला जागरण तालुकाप्रमुख मंदाताई उत्तडे, जुन्नर तालुका उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. (Junnar)
बाळासाहेब औटी पुढे म्हणाले की शोषणमुक्त भारत ग्राहक पंचायतीचे स्वप्न आहे. आजची लुटारू अर्थव्यवस्था बदलून टाकून ग्राहक पंचायतीला ग्राहक-भिमुख शेती व आधारलेली स्वदेशी अर्थव्यवस्था भारतात आणावयाचे आहे.
जुन्नर तहसीलदार सुनील शेळके म्हणाले की, सेवा हमी कायदा अंतर्गत नागरिकांना विविध दाखल्यासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये तसेच ठरवलेल्या दर पत्रकाप्रमाणे दाखले न मिळाल्यास आपण तक्रार केल्यास त्याचे निराकरण केले जाते. नागरी हक्काच्या सनदीमध्ये ठरवून दिलेल्या फी पेक्षा जादा रक्कम नागरिकांनी देऊ नये. ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायदा तसेच नागरिकांशी निगडित असणाऱ्या विविध कायद्यांचा अभ्यास केल्यास त्यांची होणारी फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले.
डॉ अशोक काळे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने तातडीने वैद्यकीय आस्थापना कायदा योग्य तो बदल करून तातडीने अमलात आणावा. आरोग्य सेवा समाजाच्या उत्तरदायी राहील तसेच आरोग्य सेवेचे प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. खाजगी आरोग्य सेवेमध्ये मन माने तसे रुग्णाकडं पैशाची मागणी केली जाते त्यावरती सरकारने ग्रामीण शहरी अशी मिळणाऱ्या सेवांची दर निश्चिती करणे गरजेचे आहे.
ग्राहक दिनाच्या निमित्ताने महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनील डोंगरे, संतोष सावंत, राजेश बोरभळकर आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विठ्ठल मुळे, सूत्रसंचालन सुनील गुंजाळ व आभार निरीक्षण अधिकारी ज्ञानेश कुलकर्णी यांनी मानले.
(Junnar)
हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ