Saturday, July 27, 2024
Homeजुन्नरनारायणगाव येथील ऐतिहासिक वास्तूमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा! 

नारायणगाव येथील ऐतिहासिक वास्तूमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा! 

जुन्नर : नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकिय विश्रामगृह या ऐतिहासिक वास्तूमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, संतोष खैरे, गणेश बिंबाजी वाव्हळ, गणेश जनार्दन वाव्हळ, गिरीराज वाव्हळ, ॲड. पंकज खरात, जुबेर शेख, संदेश वाव्हळ, सकलेन भाई आतार, कुमार चव्हाण, नितिन सोनवणे उपस्थित होते. दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी या वस्तूमध्ये दरवर्षी संविधान प्रेमी बांधव संविधान दिनाचे आयोजन करीत असतात. 

नारायणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकिय विश्रामगृह आहे, या विश्रामगृहात दिनांक 23 आणि 24 मे 1931 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास होते. पुणे जिल्हयातील पहिली बहिष्कृत परिषद बाबासाहेबांनी नारायणगाव येथे घेतली होती. तेव्हा बाबासाहेब याच वांस्तूमध्ये मुक्कामी राहिले होते म्हणुन या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. संविधान प्रेमिंच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ॲड.पंकज खरात यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय