Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नांदगाव तालुका सचिव पदी कॉम्रेड देविदास भोपळे

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नांदगाव तालुका सचिव पदी कॉम्रेड देविदास भोपळे

नांदगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष नांदगाव तालुका अधिवेशन नांदगाव येथे ज्ञानेश्वर माऊली सभागृहात संपन्न झाले. भाकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले, जिल्हासचिव भास्कर शिंदे, कॉम्रेड किरण डावखर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. भाकप तालुका नेते कॉम्रेड देविदास बोपळे यांनी 3 वर्षे चा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरोना काळात काम करणारे ऍड विद्या कसबे, संगीता सोनवणे, वसंत सोनवणे, रंगनाथ चव्हाण यांचा सन्मानपत्र ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

कॉम्रेड राजू देसले यांनी कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी नांदगाव तालुक्यात आयुष्यभर काम केले आहे. त्यांचा वारसा जपत पुन्हा एकदा शेतकरी कामगार एकजूट करून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्धार अधिवेशनात करावा असे आवाहन केले.

अधिवेशनात पुढील 3 वर्षांसाठी पदाधिकारी निवड करण्यात आली. कॉम्रेड देविदास भोपळे तालुका सचिवपदी, तर कॉम्रेड प्रकाश भावसार, संजय सोनवणे यांची सहसचिव पदी, तल खजिनदार भास्कर पवार तर कायदेशीर सल्लागार ऍड. विद्या कसबे, तालुका कार्यकारिणीत गोरख वाघ, रतन बोरसे, गोरख निकम, छगन राठोड, अशोक गांगुर्डे, नामदेव राठोड, निंबा आहेर, केवळ बोरसे, सकीरम चव्हाण यांची निवड करण्यात आली.

10 सप्टेंबर 2022 नाशिक जिल्हा अधिवेशनासाठी प्रतिनिधी निवड करण्यात आली. तसेच 18, 19, 20 सप्टेंबर 2022 रोजी 24 वे राज्य अमरावती येथे आहे. त्या साठी प्रतिनिधी निवड करण्यात आली. तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय