Friday, December 27, 2024
Homeराज्यकॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने केला शिवाजी महाराजांचा अपमान; आमदार प्रताप सरनाईक यांची...

कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने केला शिवाजी महाराजांचा अपमान; आमदार प्रताप सरनाईक यांची कारवाईची मागणी

(मुंबई) :- स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अग्रिमा जोशुआचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, तिच्यावर टीका करत, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

      शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही ट्विटरच्या माध्यमातून एक व्हीडिओ शेअर केली आहे. तसेच त्यांनी एका पत्राद्वारे अग्रिमावर कारवाई करण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना केली आहे.

     एका स्टँडअप शोमध्ये अग्रिमाने कॉमेडी करण्याच्या नादात तिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत म्हटले होते की, मला “मुंबईमध्ये बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी एका वेब साईट वर गेले, “मला तिथे एक मोठा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असे त्या निबंधामध्ये होतं. पुढे तिने म्हंटले आहे की, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं,” असे अग्रिमा जोशुआ म्हणाली आहे त्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय