Sunday, May 5, 2024
HomeNewsख्रिसमसची धूम, चर्चमध्ये दिवसभर गर्दी , विशेष प्रार्थना, कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयाेजन

ख्रिसमसची धूम, चर्चमध्ये दिवसभर गर्दी , विशेष प्रार्थना, कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयाेजन



पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: आकर्षक सजावट, चमचमणारे चर्च, लख्ख उजेडात चमकणारी सजावट, सकाळपासून चर्चमध्ये सुरू असणाऱ्या प्रार्थना आणि “मेरी ख्रिसमस, हॅप्पी ख्रिसमस”च्या शुभेच्छा अशा गोड गुलाबी वातावरणात रविवारी ख्रिसमसचा सण उत्साहात पार पडला. शहरात सर्वत्र ख्रिसमसच्या निमित्ताने इव्हिनिंग पार्टी आणि सेलिब्रेशनचे वातावरण हाेते.


पिंपरी चिंचवड शहरातील चर्चमध्ये दिवसभर गर्दी होती.
चर्चमध्ये ख्रिसमसच्या आदल्या रात्री ख्रिसमस इव्ह साजरी करण्यात आली. यामध्ये येशू जन्माची कहाणी, सर्वधर्मसमभाव, सर्वत्र समानता, मानवधर्म, मानवता, देवावर विश्वास ठेवून सेवा, क्षमा आणि शांततेचा संदेश दिला. सकाळी लवकर चर्चमध्ये प्रेयर्स सुरू होत्या. नंतर मास प्रेयर्सने दिवसभर येशू जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

ख्रिसमसच्या दिवशी शहरातील केक्स शॉप्स आणि गिफ्ट शॉप्स मध्येही गर्दी पहायला मिळाली. ख्रिसमससाठी खास प्लम केक, फ्रेश केक, मफीन्स या गोष्टींची मागणी होती. काही ठिकाणी ख्रिसमस थीम पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वीट्स पार्टी अशा गोष्टींचा समावेश होता. तरुणांसह आबालवृद्धांनी या दिवशी सण साजरा केला. ख्रिस्ती बांधवांनी रविवारी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करीत एकमेकांना “मेरी क्रिसमस”,” हॅपी क्रिसमस” अशा शुभेच्छा दिल्या.

कामगार नगर परिसरातील दि युनायटेड चर्च ऑफ क्राईस्ट, अवर लेडी कन्सलर अपलिकेटेड चर्च, काळेवाडीतील केडीसी चर्च, चिंचवड मधील सेंट झेवियर चर्च, निगडीतील इन्फंट जीजस चर्च, आकुर्डीतील ट्रिनिटी चर्च, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉन्व्हन्ट चर्च, अल्फान्सो चर्च, मार्थामा चर्च, सेंट फ्रान्सिस चर्च, मुक्ती फौज चर्च, सेंट अँडण्रुज चर्च, सेंट मेरी चर्च येथे ख्रिश्चन बांधवांनी पवित्र मिसा (प्रार्थना) अर्पण करीत एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी लहान मुलांनी डोक्यात लाल टोप्या परिधान केल्या होत्या. तर सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली होती.
चर्चच्या बाहेर येशू जन्माचा देखावा ठेवण्यात आला हाेता. ख्रिसमसच्या पूर्वरात्री आयोजित करण्यात आलेल्या पवित्र मिसा (प्रार्थना) फादर अमृत फनसेका,फादर विनय लोपेज,फादर लाजरस, पास्टर सुधीर पारकर, आशिष शेंडगे यांनी उपस्थित बांधवाना संदेश दिला.तत्पूर्वी चर्चच्या वतीने ख्रिसमस गीतांचे गायन करण्यात आले. कॅथलिक चर्चमध्ये मध्यरात्रीनंतर लहान मुलांसह उपस्थित समाजबांधवांनी आपल्या नातेवाइकांसह कोकणी, तामीळ गीतांवर नृत्य केले. कॉफी, केक वाटपाने ख्रिसमस सण साजरा करण्यात आला.

सोशलमीडियावर ख्रिसमस

ज्याप्रमाणे शहरात ख्रिसमस साजरा झाला त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही ख्रिसमस साजरा झाला. त्यात प्रामुख्याने फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर त्यांच्याच टीमकडून यूजरना “मेरी ख्रिसमस” केले जात होते. याचबरोबर दूर राहणाऱ्या मंडळींना फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून मेमरीज पाठवण्याचाही कार्यक्रम दिवसभर सुरू होता.

स्पेशल डेकोर्सना मागणी

ख्रिसमसट्रीपुरते मर्यादित राहता यंदा ख्रिसमसमध्ये स्पेशल डेकोर्सला मागणी होती. त्यात प्रामुख्याने इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स, इको फ्रेंडली डेकोर विशेष चालले. ज्यात खऱ्या ख्रिसमस ट्री वापरून केलेली सजावट, थीम केक या गोष्टी चर्चेत होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय