Wednesday, January 15, 2025
HomeNewsचिंचवड : पाथरवट कुटुंबाना किराणा वाटप, जनतेने पाटे वरवंटे खरेदी करून समाज...

चिंचवड : पाथरवट कुटुंबाना किराणा वाटप, जनतेने पाटे वरवंटे खरेदी करून समाज जगवावा

पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील मुंबई पुणे रस्त्याच्या कडेला आवाज करत छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या स्वयंपाक घरातील पाटा, वरवंटा, खलबत्ता ई साधने बनवणाऱ्या पाथरवट समाजातील कुटुंबाना विप्ला फाउंडेशनच्या शिक्षक दाम्पत्याने किराणा वाटप केले. संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण कदम, प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्रा.दिपक जाधव आणि प्रा.वैशाली गायकवाड या शिक्षक दाम्पत्याने ४० किराणा किट वितरित केले.

संस्थेचे प्रा.दिपक जाधव म्हणाले की, आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे, वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा होत आहेत. शहरात गेली २० वर्षे पाथरवट समाज पाटा वरवंटा टिकवण्यासाठी फुटपाथवर छिन्नी हातोडीच्या घाव टाकून साधने बनावत आहे, जनतेने स्वयंपाक घरामध्ये एखादा पाटा वरवंटा खरेदी करून या समाजाला जगावावे, कोरोना महामारीमुळे आर्थिक दुरावस्था झाली आहे. त्यांची किराणा घ्यायची ऐपत राहिलेली नाही, म्हणून ही मदत करत आहोत.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय