Saturday, May 4, 2024
HomeNewsचिखली : महाआरोग्य व भव्य नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न ; रोहन चव्हाण...

चिखली : महाआरोग्य व भव्य नेत्र चिकित्सा शिबीर संपन्न ; रोहन चव्हाण सोशल फाउंडेशनचा उपक्रम

नेत्र चिकित्सा, चष्मे वाटप आरोग्य शिबिरास भव्य रक्तदान शिबीराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: चिखली जाधववाडी, वडाचा मळा येथील युवा उद्योजक रोहन चव्हाण यांनी वाढदिवसानिमित्त महाआरोग्य, रक्तदान, नेत्रचिकित्सा व मोफत चष्मे शिबिर आयोजित केले होते.

या शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे प्रसंगी रोहन चव्हाण म्हणाले की, येथील स्थलांतरीत, अंगमेहनती, रोजंदारी श्रमिक नागरिकांना आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. कोरोना काळाने आरोग्याचे महत्व आणि त्याचे मोल कळले आहे. आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा आहे. वृद्ध, महिला व गरजू नागरिकांसाठी सोशल फाउंडेशन काम करणार आहे.

लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई व मोरया ब्लड बँक चिंचवडगाव यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचा मोठ्या संख्येने महिला वर्गाने लाभ घेतला. नेत्र तपासणीस 1092 नागरीकांचा प्रतिसाद व 612 जणांना मोफत चश्मा वाटप करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबीरास 1976 नागरीकांचा प्रचंड प्रमानात चांगला प्रतिसाद मिळाला. वाढदिवसाच्या निमित्ताने विकास बालक अनाथ आश्रम, चिखली व पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट संचालित अंध शाळा भोसरी येथील मुलांना मिठाई व अन्नदान करण्यात आले. पांजरपोळ गोशाळा येथील जनावरांना चारा वाटप करण्यात आले. परिसरातील जेष्ठ नागरिक, सेवाभावी संस्थांनी अभिष्टचिंतन केले.

या कर्यक्रमाचे संयोजन दर्शन इधाटे, सुरज कोंडारे, सुरज राऊत, उमेश आवटे, राहुल बोऱ्हाडे, श्रेयश जाधव, कुणाल ताजणे, स्वराज बोराटे, तेजस आल्हाट, सिद्धेश भालेकर, अभिषेक नेवाळे, सर्वेश वाळके, पियुष घोलप, ओंकार जाधव, मयुर काळे, अतुल भांगे, उमेश महाजन, रोहित भांगे, स्वराज चव्हाण, कुणाल नाचन, नरेश चौधरी, आदित्य कांबळे, सौरभ पडवळ, प्रेम राठोड, शिवरत्न घंटे, अक्षय जाधव, दिनेश चव्हाण, संजय राठोड, वैभव चव्हाण, किरण वनवे, जुबेर शेख, गणेश साठे, त्रृणाल झोबाडे, प्रदिप पायमोडे, रोहन गवळी, संकेत खिळे, किरण सावंत, सिद्धार्थ बागुल, अजित माने, अभि पाटील, शुभम पोळ, अमन अत्तर, नवनाथ गोसावी, अनिकेत जाधव, सुरज आल्हाट, रशिक जाधव, पवन पोटे, ओंकार खापरे, गजानन इगंळे, वेदांत मांडेकर, साहील देवकर, ऋतिक मुकरे, ओंकार वाबळे, रोहित चव्हाण, तन्मय जाधव, ऋत्विक गिलबीले, प्रविन पवार, संदेश काळभोर, नकुल बोत्रे व समस्त रोहन चव्हाण सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यानी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय