Brijbhushan Singh : उत्तर प्रदेश भाजपचे नेते आणि माजी कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित केले. ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कैसरगंजचे भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी काही महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर कथित लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यावेळी काही ऑलिम्पिक कुस्तीपटू तसेच काही खेळडू पीडित महिला कुस्तीपटूंचा आवाज म्हणून आंदोनल करत होत्या. आता दिल्ली कोर्टाने ब्रिजभूषण सिंहवरील आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या वर्षी १५ जून रोजी आरोपपत्र दाखल केले होते. ब्रिजभूषण यांच्यावर कलम 354, 354-ए, 354-डी आणि 506 अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, न्यायालायाने आरोप निश्चित करण्यासाठी नकार दिला. मात्र कुस्तीपटू महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला कळवलं की तपास सुरू आहे. काही दिवसांआधी ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला.
हे ही वाचा :
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान
राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप
‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक
TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती
मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे