पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:मंगळवार दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या डेपो वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत एम.टी.एस.एस.डी वर्कर्स युनियन व संरक्षण कामगार संघटना (इंटक) यांच्या युतीच्या दहा उमेदवारांनी भारतीय मजदूर संघाच्या दहा उमेदवारांचा पराभव करुन भरघोस मताने निवडून आले.
एफ.डी.आय, नवीन पेन्शन योजना, खाजगीकरण, कामगार कायद्यामधील वारंवार होणारे बदल व बंद पडत असलेले संरक्षण उद्योग, या केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी सेंट्रल ए.एफ.व्ही. डेपोतील दोन्ही मोठ्या संघटनानी कामगारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन ही निवडणूक लढविली होती असे एम. टी.एस.एस.डी. वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी साथी. विशाल डुंबरे व संरक्षण कामगार संघटना (इंटक) चे जनरल सेक्रेटरी सुनिल पवार यांनी सांगितले .
जवळपास ८९ टक्के कामगारांनी या विचाराला पसंती दाखवत मोठ्या फरकाने संयुक्त कामगार आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मते देऊन निवडून दिले. यामध्ये रमेश अदिरला, बबन भोरे, संजय जोशी, गणेश पिंपळकर ,कमलाकर खोत, टिपू सुलतान मुल्ला, अनिल काटे, संपत, शशिकांत सोलंकी, संदेश टिळेकर या विजयी उमेदवारांचे अभिनंदन.सदरची निवडणूक साथी. सलीम सय्यद व ए.टी. वर्गीस या दोन्ही संघटनाच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये रमेश अदिरला, बबन भोरे, संजय जोशी, गणेश पिंपळकर ,कमलाकर खोत, टिपू सुलतान मुल्ला, अनिल काटे, संपत, शशिकांत सोलंकी, संदेश टिळेकर हे उमेदवार विजयी झाले.