Cabbage Pakoda : सहसा घरामध्ये कोबीची भाजी किंवा कोबी हा पदार्थच किंवा कोबीच्या बाबतीत विचार केला तर कोबी कोणालाच आवडत नाही. कारण कोबी बनवून खायचा हा प्रकार सध्या नकोस झालेला आहे, सहसा पत्ता कोबी हे गरिबांचे खाणे आहे असे समजले जाते. परंतु मी बऱ्याच वेळेला कर्नाटकात जमखंडीला वर्षातून पर्यटन करत असतो, एकदा महाराष्ट्राची सीमा संपली की, आपल्याला उगार आणि खुर्ची नावाची गाव लागतात.
तिथे कर्नाटक पद्धतीची कोबीची (Cabbage Pakoda) भजी खायला मिळतात आणि त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या एस टी गाड्या, खाजगी बसेस, बसेस तिथे थांबतात. ही गावे छोटी आहेत, पण येथील कोबीची भजी सुप्रसिद्ध आहेत. वीस रुपयांत चार मोठी भजी आणि मिरच्या असतात.
आपण बऱ्याच वेळा विचार करतो की भजी फक्त कांद्याचीच बनवतात का? सुरुवातीला तसं होतं, नंतर मग मुगाची आली नंतर अजून त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आले, पण कोबीची भजी बनवून खाल्ली तर ती खूप चांगली चविष्ट आणि पौष्टिक असतात.
कोबीच्या वेगवेगळ्या रेसिपी कर्नाटकच्या लोकांनी अगदी परवडणाऱ्या दरात बनवलेल्या आहेत त्यातलीच ही कोबीची भजी!
हा पत्ताकोबी जो सर्वसाधारण बाजारात सहज उपलब्ध असतो मुलांना सुद्धा आपलं काही वेगळे द्यायचं असेल सुट्टीच्या दिवशी बाहेरची जे सर्व साधारण प्रचलित असलेली भजी खाण्यापेक्षा कोबीची भजी घरी बनवुन दिलीत तर आनंद होईल, आणि कोबी मध्ये जीवनसत्वे भरपूर असतात. तुम्ही सहज घरामध्ये बनवू शकता भजी, तो कोबी बारीक चिरा मध्यम शिरा किंवा तुम्हाला जशा पद्धतीचे पाहिजे तशा पद्धतीने तो कोबी चिरून वेगवेगळ्या प्रकारे भजी बनवाल.
अतिशय सुंदर एक रेसिपी आज आम्ही सादर करत आहोत.
कोबीच्या भजीची रेसिपी :
कोबीची टोके कापून उभा पातळ चिरावा. चिरल्यावर हाताने मोकळा करावा. त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पावडर, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे. त्यात एक कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ, दहा मिनिटे मिक्स करा.
नंतर त्याला पाणी सुटते, यावर कडकडीत तेलाचे २ चमचे मोहन घालावे. हातानी थोडे थोडे मिश्रण उचलून कोणताही आकार न देता तेलात तळावे. कोबी जसा चिराल तशी भजी होतात. खमंग कुरकुरीत कोबीची भजी ही नवी रेसिपी, ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांनी कोबीच्या भजीचे स्टार्ट अप सुरू करा.
संकलन – क्रांतीकुमार कडुलकर
हेही वाचा :
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर