Wednesday, December 4, 2024
Homeआंतरराष्ट्रीयBreking : पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हकालपट्टीसाठी protest आंदोलक रस्त्यावर

Breking : पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हकालपट्टीसाठी protest आंदोलक रस्त्यावर

जेरुसलेम : इस्रायलमधील प्रचंड राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत, युद्धाला कंटाळलेल्या दहा हजारांहून जास्त  इस्रायलींनी जेरुसलेम मध्ये मोर्चा काढला, (More than ten thousand Israelis marched in Jerusalem) आणि गाझामध्ये ओलीसाना मुक्त करण्यात अपयश आल्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

protest in Israel

रविवारी (३१ मार्च) संध्याकाळी निदर्शकांनी इस्त्रायली संसदेसमोर रॅली काढल्यानंतर, आग पेटवून आणि राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर आंदोलकांनी जेरूसलेममध्ये शहरातील सर्वांत मोठा उत्तर-दक्षिण हायवे बेगिन बोलवार्ड अडवला होता. त्यामुळे आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननमधून पाण्याचे फवारे मारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. Israel news

हमासचा खात्मा करण्यासाठी सुरू झालेल्या युद्धाला नागरिकांनी पाठिंबा दिला होता, मात्र हे युद्ध ज्या पद्धतीने हाताळले जात आहे, त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

अनेक आंदोलकांनी नेतन्याहूच्या चेहऱ्यावर रक्ताने माखलेले फलक हातात घेतले होते आणि  हमासपासून देशाचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप आंदोलक करत होते. इतके दिवस सुरू झालेल्या युद्धात हमासच्या ताब्यातून ओलिसांची सुटका करण्यात सरकारला यश आलेले नाही. Israel news

संबंधित लेख

लोकप्रिय