Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : किरीट सोमय्या प्रकरणावर संंजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

---Advertisement---

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या किरीट सोमय्या यांना टोला लगावला आहे. आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे:” जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे.. जय महाराष्ट्र असं ट्वीट राऊत यांनी केलं आहे.

किरीट सोमय्या यांचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर देखील चर्चांना उधान आले असून अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

---Advertisement---

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी व्हिडिओची सत्यता तपासाण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी अशी विनंती केली आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : किरीट सोमय्या यांच्या अश्लिल व्हिडिओवर सोमय्या म्हणतात…

आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार

समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून

अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान

धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या

‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण

MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles