Home ताज्या बातम्या Breaking news पंढरपूरमध्ये भीषण स्फोट, 1 किमीचा परिसर हादरला, 1 ठार

Breaking news पंढरपूरमध्ये भीषण स्फोट, 1 किमीचा परिसर हादरला, 1 ठार

Breaking news Massive explosion in Pandharpur, 1 km area shook, 1 killed
Breaking news Massive explosion in Pandharpur, 1 km area shook, 1 killed

पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरमधील सांगोला तालुक्यातील महूद गावात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एक जण ठार झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील महूद गावात हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलं नाही. शुक्रवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. मात्र, याची माहिती आज सकाळी समोर आली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटने एक किलोमीटर परिसर हादारला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी असलेली दुकानं आणि घराच्या भिंती कोसळल्या आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी एक सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. क्रॉम्परेसरचा स्फोट झाला असावा अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, घराच्या भिंती कोसळल्या. या परिसरात असलेल्या घरांच्या काचा फुटल्या. शेजारी घरांच्या भिंतीनाही तडे गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या स्फोटामध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. पण मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. तर स्फोटात आणखी एक जखमी झाला आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे.

गगनयान’ मोहिमेत ‘हे’ चार अंतराळवीर, पंतप्रधान मोदींनी केली नावांची घोषणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘भीम टोला’ आंदोलन, पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या जमा होणार केंद्र आणि राज्याचे ‘इतके’ पैसे

Exit mobile version