Wednesday, September 18, 2024
HomeNewsबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज !

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज !

 पुणेबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

धर्मेंद्र यांना शूटिंगदरम्यान पाठीचा स्नायू खेचला गेल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती

त्यांनी आता ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला त्यांनी “मित्रांनो, मी धडा शिकलो आहे, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे तसेच यात ते एकदम फिट असल्याचे दिसत असून त्यांनी त्यांच्या पाठीच्या दुखण्याविषयी माहिती दिली आहे. तसेच आपण रुग्णालयात असताना आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वच चाहत्यांचे त्यांनी आभार देखील मानले आहेत.

अभिनेता धर्मेंद्र यांना शूटिंग दरम्यान पाठदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा झल्यानंतर रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याविषयीची माहिती मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

रिकामटेकड्याना प्रसिद्धी देऊ नये – अजित पवार

संबंधित लेख

लोकप्रिय