Saturday, April 1, 2023
HomeNews'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'चा रक्तसंकलनाचा निर्धार महत्वपूर्ण आणि कौतुकास्पद - चंद्रकांत पाटील

‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’चा रक्तसंकलनाचा निर्धार महत्वपूर्ण आणि कौतुकास्पद – चंद्रकांत पाटील

खराडीमध्ये रक्तदान महाशिबीरातून ३५९३ रक्तपिशव्यांचे संकलन

पुणे
: “सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’मार्फत आयोजित केले जाणारे रक्तदान महाशिबीर हा एक उपक्रम कौतुकास्पद आहे. विशेषतः कोरोनाकाळात यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठी मदत झाली. फाऊंडेशनने कोरोनाकाळात इतर कामांद्वारेही उल्लेखनीय योगदान दिले. यासाठी सुरेंद्र पठारेंचे विशेष कौतुक आणि अभिनंदन” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सुरेंद्र पठारे फाऊंडेशनद्वारे खराडी येथे आयोजित रक्तदान महाशिबीराचा औपचारिक शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यंदा सलग तिसऱ्या वर्षी सुरेंद्र पठारे फाऊंडेशन द्वारे रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. पहिल्या रक्तदान शिबीरातून विक्रमी १,६४४ तर दुसऱ्या रक्तदान शिबीरातूनही तब्बल ३,४५३ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन झाले होते. यंदाचे रक्तदान शिबीर गुरुवार (दि. २६) प्रजासत्ताक दिनी खराडी येथे पार पडले, ज्यातून तब्बल ३,५९३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले.

“रक्तदान हे श्रेष्ठदान असून दरवर्षी रक्तदात्यांचा उस्फुर्त आणि विक्रमी सहभाग हे आमचे मनोबल वाढविणारा असून, या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राची रक्ताची गरज भागविण्यासाठी उल्लेखनीय वाटा उचलू शकलो आहोत याचे समाधान आहे.” अशी प्रतिक्रिया आयोजक आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस सुरेंद्र बापुसाहेब पठारे यांनी नोंदवली. यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे आदी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय