Thursday, December 5, 2024
Homeग्रामीणवन विभागाने २ हेक्टर शेतातील लावलेला कापूस उपटला. किसान सभेची गुन्हे दाखल...

वन विभागाने २ हेक्टर शेतातील लावलेला कापूस उपटला. किसान सभेची गुन्हे दाखल करण्याची मागणी.

नांदेड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील मांडवी वन क्षेञात दारसांगवी (सी) बाबानाईक तांडा येथील शेतकरी सुदाम अंबरसींग राठोड यांच्या वन जमिनीतील २ हेक्टर जमिनीवर जिवंत कापूस फोरेस्ट वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपटले.

ती जमिनी वनविभागाची आहे. फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी वनजमिनीतील कापूस उपटून टाकला आहे. 

विनायक तायनाके

विभागीय वन अधिकारी

        वन विभाग मांडवीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी २० जून रोजी वनजमिन कसत असलेले शेतकरी वनिता सुदाम राठोड व सुदाम अंबरसींग राठोड यांना कोणतीही पूर्व सुचनां न देता, सरळ कार्यवाही करत शेतात जिवंत असलेला ३ बॅग कापूस उपटून टाकले आणि वनजमिन तात्काळ खाली करण्याची धमकी दिली, असल्याचे म्हटले आहे.

     सदरील वनजमिन गेली अनेक वर्षी वडीलोपार्जि सुदाम राठोड हे कसत आहेत. वनाधिकार कायदा २००५ प्रमाणे सुदाम राठोड हे वनजमिनिचे मालक होण्यास पाञ आहेत. या आधी सुदाम राठोड यांनी २००२ मध्ये वन अधिकार दावा दाखल केला होता, पण तो वनसमितीने रद्द केला होता. सहायक जिल्हा अधिकारी किनवट यांनी २०१६ च्या पञानुसार जी सर्व दावे दाखल होत नाहीत, त्या दाव्यांचे निकाल येत नाही तो पर्यंत वनविभाग कुठल्याही प्रकारे वनजमिन कसणाऱ्या शेतीमध्ये जाऊ शकत नाहीत. तथा अनुसूचीत जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्यता) अधिनियम २००६ ,नियम २००८, व सुधारित नियम १०१२ चे उल्लंघन वन विभाग मांडवी यांनी केले असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

माझी वडीलोपार्जीत वन जमीन मी कसत आहे , मांडवी वन विभागाच्या दादागिरी मुळे माझ्या शेतातील जिवंत कापूस त्यांनी उपटला, हे माझ्यासाठी प्रचंड वेदनादायक आहे, मी आणि माझा परिवार दहशतीत आहोत! आम्ही टोकाचे पाऊल उचल्यास जबाबदारी फोरस्ट विभाग असेल.

शेतकरी

सुदाम राठोड

    मांडवी वनविभागाचे वनक्षेञ अधिकारी यांच्या आदेशाने वनपाल सालमेटे, वनरक्षक काळे व त्यांच्या इतर ८-१० कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने सुदाम राठोड यांच्या शेतात जाऊन ३ बॅक जिवंत कापूस उपटून फेकून दिला. 

फोरेस्ट विभागाची मुजोर दादागिरी बंद करा; संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा परिणाम वाईट होतील.

अर्जुन आडे

अखिल भारतीय किसान सभा

राज्य कार्याध्यक्ष

     शेतकऱ्यांच्या शेतातील पिक आशा दादागिरीने उपटून टाकण्यात आले असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने म्हटले आहे. तसेच संबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय