गेवराईत कृषी सभापतींकडून कृषी सेवा केंद्राची झाडाझडती
गेवराई :- (प्रतिनिधी)
बीड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी मंगळवारी सकाळी कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गेवराई शहरातील कृषी सेवा केंद्र दुकानांना अचानकपणे भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी त्यांना दुकानात भावभलक नाही, विक्री बिलात त्रुटी आढळून आलेल्या दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेऊन जिल्ह्यात खतांचा तुडवडा पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दुकानदारांना देतानाच चढ्या भावाने खते विक्री केल्यास खपवून घेणार नसल्याच्या सुचना देखील संबंधितांना दिल्या.