Thursday, December 5, 2024
Homeराज्यउदय सामंत यांची विरोधकांवर टीका "भावीपिढीच्या जीवाशी कुणी खेळू नका"

उदय सामंत यांची विरोधकांवर टीका “भावीपिढीच्या जीवाशी कुणी खेळू नका”

(प्रतिनिधी):- सध्या अंतिम वर्षाच्या परिक्षा हा वादाचा विषय ठरला आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या वादानंतर पुण्यातील काही शैक्षणिक संस्थांनी परीक्षा घेण्याची तयारी दर्शवल्या नंतर हा वाद त्रिसूत्री झाल्याचे दिसते आहे. पालक आणि विद्यार्थी संघटना परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. 

      आयआयटी सारख्या उच्चतम संस्थेने परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने परिक्षा रद्द केल्या आहेत. उत्तरप्रदेश, ओडिशा, तेलंगणा या राज्यांनी परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

        असे असले तरी महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परिक्षावर अद्याप राजकारण सुरु आहे, त्यामुळे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे, त्यांनी म्हंटले आहे की, “भावीपिढीच्या जीवाशी कुणी खेळू नये.. ज्यांना सत्तेत असताना विद्यार्थ्यांची आठवण आली नाही त्यांना त्यांच्या भवितव्यावर  बोलण्याचा अधिकार नाही…. विद्यार्ध्याच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचाच निर्णय होणार.” असे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय