Thursday, December 5, 2024
Homeराजकारणकामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन.

कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन.

औरंगाबाद (प्रतिनिधी) : कोविड-१९ मुळे लॉकडाऊन काळात जनतेचे व कामगार वर्गाचे निर्माण झालेले प्रश्न तात्काळ सोडवावे यासाठी विविध मागण्यांना घेऊन कामगार कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समिती तर्फे औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले.

तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना देण्यात आले, कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. औरंगाबाद शहरात व संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या १५ दिवसात तर रुग्ण संख्या दुप्पटीने वाढली आहे. रोज २०० ते ३०० नव्या रुग्णांची भर पडत आहे.अश्या परिस्थितीतही प्रशासनाकडून पुरेशी व्यवस्था केली जात नाही.

खाजगी दवाखान्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे गरीब व श्रमिक वर्गाची कोंडी होत आहे. अश्या परिस्थितीत शासनाने तात्काळ शहरातील इतर खाजगी हॉस्पिटल ताब्यात घ्यावेत व तिथे रुग्णांची व्यवस्था करावी. लॉकडाउन मुळे कामगार व श्रमिक जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांनी कामगारांचे वेतन दिले नाही.

सर्व कामगारांच्या कोरोना चाचण्या करा, कामगारांना ५० लाखाचे विमा कवच लावा, लॉकडाऊन काळातील कायम व कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे संपूर्ण वेतन १५ दिवसांच्या आत तात्काळ दिला नाही तर कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल.

ऍड.उध्दव भवलकर, निमंत्रक

 कामगार कर्मचारी कृती समिती

अनेक कंपन्यांनी कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. म्हणून लॉकडाउन काळातील संपूर्ण वेतन कायम व कंत्राटी कामगारांना मिळाले पाहिजे. कामावरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करावे, कामगार कायदे रद्द करणारे सर्व नियम मागे घ्यावे, सर्वांना दरमाणसी दरमहा १० किलो धान्य मोफत द्यावे, शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करा, लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी सिटू चे राज्य उपाध्यक्ष ऍड.उद्धव भवलकर, आयटक चे प्रकाश बन्सोड, राम बाहेती, इंटक चे एम. ए.गफ्फार, एच.एम.एस चे सुभाष लोमटे, लक्ष्मण साकृडकर, प्रभाकर मते, सुभाष पाटील, अनिल दाभाडे, रंजन वाणी, देविदास जरारे, बसवराज पटणे, सिद्धांत गाडे, दत्तू भांडे, शेळके पाटील आदीसह कामगार उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय