Sunday, January 12, 2025
HomeNewsपाडोशी येथे बिरसा बिग्रेड शाखेचे उद्घाटन समारंभ संपन्न

पाडोशी येथे बिरसा बिग्रेड शाखेचे उद्घाटन समारंभ संपन्न

 

अकोले/यशराज कचरे : अकोले तालुक्यातील पाडोशी येथे बिरसा बिग्रेड शाखेचे उद्घाटन समारंभ बिरसा बिग्रेड चे अकोले तालुका प्रमुख केशव दिघे महिला कार्यकर्त्या ऍड. योजनाताई बेंडकोळी यांच्या उपस्थित आज संपन्न झाला.

यावेळी ताल तालुकाध्यक्ष केशव दिघे म्हणाले, बिरसा बिग्रेड चे कार्य व उद्धिष्ट, यांचे समावलोचन मोजक्या शब्दात मांडून सह्याद्रीत बिरसा बिग्रेड चे कार्य कसे वाढेल व आदिवासी समाजाचे प्रश्न संंघटनेच्या माध्यमातून कसे सुटतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुढे बोलताना म्हणाले, आज आदिवासी समाजासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. इको सेन्सिटीव्ह झोन असेल, रोजगाराचा प्रश्न असतील, धर्म कोड याबाबतचा प्रश्न असेल वा आदिवासींना जंगलापासून कस दुर करत करत आहे.  यासाठी चळवळीच्या माध्यमातून लढा द्यायचा आहे.

आदिवासी एक झाला पाहिजे व त्यानं आपली संस्कृती परंपरा टिकवली पाहिजे, यासाठी हि चळवळ आहे. बिरसा बिग्रेड च काम सात राज्यात काम आहे. याच माध्यमातून देशातील तमाम आदिवासी समाजाचे प्रश्न सुटणार आहेत, प्रत्येक गावोगावी बिरसा बिग्रेड कशी पोहचेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत जेष्ठ महिला कार्यकर्त्या ऍड. योजनाताई बेंडकोळी यांनी व्यक्त केले.

यावेळी ऍड. यशवंत पारधी, नवनाथ लहागे, दत्तू माळी आदीसह नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय