मुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
■ वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी पुढीलप्रमाणे :
१) किराणा दुकाने – सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
३) भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
५) अंडी, मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११ सुरू राहतील.
९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार या बाबींचे जनतेने पालन करावे.
इतर बाबी पुढीलप्रमाणे :
◆ हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
◆ धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
◆ आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
◆ भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
◆ दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
◆ टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्त्यावशक सेवेकरिता चालू राहील.
◆ चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
◆ दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्त्यावशक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
◆ सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
◆ कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
◆ शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
◆ स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
◆ विवाह समारंभास बंदी राहील.
◆ चहाची टपरी,दुकाने पूर्णतः बंद राहतील.
◆ अत्त्यावशक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
◆ सिनेमाहॉल,नाट्यगृह ,सभागृह,संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
◆ सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
◆ सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
◆ सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
◆ व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
◆ बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.