Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यआशांच्या लढ्याला यश, "या" महानगरपालिकेकडून दरमहा ५ हजार कोव्हीड भत्ता मंजूर

आशांच्या लढ्याला यश, “या” महानगरपालिकेकडून दरमहा ५ हजार कोव्हीड भत्ता मंजूर

लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या लढ्याला यश

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालीकेकडून आशा व गटप्रवर्तकांना दरमहा ५ हजार कोव्हीड भत्ता मंजूर केला. लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या लढ्याला यश मिळाल्याचे संघटनेचे नेते कॉम्रेड हनमंत कोळी व जिल्हा अध्यक्ष मिना कोळी यांनी सांगितले.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना दरमहा ५ हजार रुपये कोवीड भत्ता आज झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला. 

याचा लाभ महनगरपालिके कडील २०१ आशा वर्कर्स व १ गटप्रवर्तक यांना होणार आहे. याबद्दल युनियनच्या वतीने आयुक्त, उपायुक्त महापौर उपमहापौर, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मागील वर्षी कोवीड महामारी सुरु झाली, त्यावेळेसच संघटनेने शासनाकडे मागणी केली होती. त्यावेळी शासनाने लगेच प्रोत्साहन भत्ता सुरु केला. तसाच प्रोत्साहन भत्ता स्थानिक स्वराज्य संस्थानी देखील सुरु करावा अशीही संघटनेची मागणी होती. 

सांगली महापालिकेतील नगरसेवकांनी आपल्या मानधनातील रक्कम देऊन गतवर्षी आशा वर्कर्संचा सन्मान केला होता, असे ही महापलिका क्षेत्र अध्यक्ष वर्षा ढोबळे यांनी सांगितले.

यावर्षी देखील या महामारीत आशा वर्कर्सच्या कामाचे महत्व ओळखून त्यांना दरमहा ५ हजार रुपये भत्ता सुरु केला आहे, असाच प्रोत्साहन भत्ता केंद्र सरकारने देखील सुरु करावा यासाठी युनियन प्रयत्नशिल आहे. पण निवडणकांना केंद्रस्थानी मानलेल्या केंद्र सरकारला आरोग्यविषयक प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टिकाही लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनचे सरचिटणीस उमेश देशमुख यांनी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय