भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांचा पुढाकार
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : भीम गीते, भक्ती गीते आणि हिंदी सिनेसृष्टीतील बहारदार ‘संगीत वर्षा’मध्ये दिघीकर अक्षरश: ‘चिंब’ झाले. निमित्त होते प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक विकास डोळस यांच्या पुढाकाराने दिघी येथील सर्वे. नं. ८३, वाळके मैदान, ममता स्विटजवळ मंगळवारी सायंकाळी आनंद शिंदे प्रस्तूत ‘संगीत वर्षा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा सांगत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा महिमा विशद करीत आनंद शिंदे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून भोसरी, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, क्रीडा विषयक आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231130-WA0004.jpg)
चऱ्होलीतील ‘खेळ रंगला पैठणीचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद…
माजी नगरसेविका सुवर्ण बुर्डे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास बुर्डे यांच्या पुढाकाराने चऱ्होली येथील श्री वाघेश्वर घाट येथे संकर्षण कुऱ्हाडे प्रस्तूत ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला परिसरातील अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी आमदार महेश लांडगे यांचा ‘भक्ती-शक्ती शिल्प’ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी स्वीकृत नगरसदस्या साधना तापकीर, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर यांच्यासह चऱ्होलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मोशी येथील भैरवनाथ मंदिर येथे राजेश सस्ते यांच्या पुढाकाराने संगीत भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संतोश मोरे यांच्या पुढाकाराने चिखली येथील वृद्धाश्रमामध्ये अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला.
‘आयुष्यावर बोलू काही’ मुळे रसिक मंत्रमुग्ध…
निगडी प्राधिकरण येथील साहित्यिक ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे मणिकर्णिका प्रतिष्ठानच्या पुढाकाराने मुक्ता गोसावी आणि सहकाऱ्यांनी कवि गीतकार संदीप खरे आणि गायक सलील कुलकर्णी यांचा ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाना मोफत प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती. या कार्यक्रमामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/08/IMG_20220807_111017.png)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231128-WA0054-737x1024.jpg)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/06/IMG_20230621_121458-724x1024.jpg)