Tuesday, July 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभारतीय तरुणांना 3 वर्ष सैन्यात सक्तीची सेवा देण्याची महत्वाकाक्षी योजना !

भारतीय तरुणांना 3 वर्ष सैन्यात सक्तीची सेवा देण्याची महत्वाकाक्षी योजना !

 

देशप्रेम आणि देशाची सेवा करण्यासाठी ब्रिटनमध्ये सर्व नागरिकांना एकदा तरी लष्करात सेवा करण्याचा सक्तीचा नियम आहे. अशाच धर्तीवर भारतातही तीन वर्षे सैन्यात सेवा करण्याची महत्वाची योजना मोदी सरकार आणण्याची तयारी सुरु झाली आहे.

संरक्षण दलावरील वाढलेला खर्च आणि वयाची मर्यादा कमी करण्यासाठी केंद्र सरकार अग्निपथ एंट्री स्कीम नावाची नवीन योजना राबविणार आहे. यानुसार देशातील तरुणांना तीन वर्षांसाठी सैन्यात सहभागी होता येणार आहे. तसेच देशाची सेवा करता येणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

या तीन वर्षांच्या काळात या तरुणांना जवान नाही तर अग्निवीर या नावाने ओळखले जाणार आहे. तिन्ही सैन्य दलांनी मोदी सरकारसमोर हा प्रस्ताव मांडला आहे. या अग्निवीरांना सैन्यात कायम देखील केले जाऊ शकते, अन्य तरुणांना नोकरी सोडण्याचा पर्याय मिळणार आहे. याचा फायदा या तरुणांना खासगी नोकऱ्या मिळविण्यासाठी देखील मिळणार आहे. कारण सैन्याचे प्रशिक्षण मिळालेले तरुण नोकरीवर ठेवण्यास कार्पोरेट घराण्यांनीही रस दाखविला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय