Wednesday, September 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयकाळजी घ्या ! महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात वाढ !

काळजी घ्या ! महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात वाढ !

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यात उष्णतेचा पारा चढला असल्याने नागरिक मात्र त्रस्त झाले आहेेेत. अनेक भागात तापमान 40च्या पार गेले असताना पुढचे काही दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

पुढचे दोन दिवस मराठवाड्यात उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार आहे. तर विदर्भात देखील पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पुढचे दोन ते दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठवाडा, विदर्भात उन्हाचा चटका कायम असल्याचं दिसत असताना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र शुक्रवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या 48 तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट तर दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह राजस्थान, दक्षिण हरियाणा-दिल्ली, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यात देखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आता इडी ( ED) च्या रडारवर !

संबंधित लेख

लोकप्रिय