जुन्नर : भगवान श्री जिव्हेश्वर स्वकुळ साळी समाजमंदिर येथे स्वकुळ साळी समाज संस्था, जुन्नर च्या वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष टण्णू आणि सेक्रेटरी अरूण असुभे यांनी दिली.
श्री जिव्हेश्वर मुर्ती अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, पोथीवाचन करण्यात आले. तसेच दिगंबर विष्णु उगले यांना ‘स्वकुळ भुषण पुरस्कार’ यांना श्री जिव्हेश्वर समाचार चे किशोर चंदावस्कर व उद्योजक राजेश उगले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्र जुंदरे, ज्ञानेश्वर केंद्रे, सुनिल टण्णू, अर्जून कांबळे, माजी नगरसेवक कुलदिप खोपे, अमोल टण्णू, रमेश टण्णू, अक्षय टण्णू, किरण टण्णू, चंद्रकांत उगले, अरविंद मते, सुरेश टण्णू, प्रसाद टण्णू, वैशाली खोपे, शितल जंगर, मनिषा केंद्रे, भाग्यश्री जुंदरे, अनिता टण्णू, राजश्री वाडकर, रजनी मते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे यांनी केले, तर प्रास्ताविक राजेंद्र जुंदरे यांनी केले.