Thursday, April 25, 2024
Homeराजकारणशिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे साडेपाच वाजता खोपली (Khopli) इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन डोंगर कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय