Tuesday, September 17, 2024
Homeआंतरराष्ट्रीयमोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे...

मोठी बातमी : जय शाह बनणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष

Jay Shah Next ICC Chairman : बीसीसीआयचे सचिव जय शाह हे ग्रेग बार्कले यांची जागा घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवे अध्यक्ष होणार आहेत. शाह हे जगमोहन डालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन, आणि शशांक मनोहर यांच्यानंतर ICC चे अध्यक्षपद भूषवणारे पाचवे भारतीय असतील. 34 व्या वर्षी, जय शाह हे ICC चे अध्यक्षपद भूषवणारे सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरणार आहेत.

ग्रेग बार्कले (Greg Barclay) नोव्हेंबर 2020 मध्ये ICC चे अध्यक्ष बनले होते आणि 2022 मध्ये ते बिनविरोध पुनर्निवड झाले. नियमांनुसार त्यांना तिसऱ्या आणि शेवटच्या टर्मसाठी देखील हक्क होता, परंतु त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

ICC ने आपल्या एका निवेदनात सांगितले होते की, “ICC चे अध्यक्ष ग्रेग बार्कले (Greg Barclay) यांनी बोर्डाला कळवले आहे की ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या शेवटी संपल्यानंतर ते पद सोडतील.”

Jay Shah

अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन 27 ऑगस्टपर्यंत जमा करायचे होते. जय शाह (Jay Shah) हे एकमेव उमेदवार असल्यामुळे निवडणुकीची गरज भासली नाही. जय शाह यांची नियुक्ती ICC चे अध्यक्ष म्हणून निश्चित झाली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आठ महिन्यांतच कोसळला, पंतप्रधान मोदींनी केले होते उद्घाटन

कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात

गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा

बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती

ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी

मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

संबंधित लेख

लोकप्रिय