पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे, कोयता गँगचे गुंड वाहनांची तोडफोड तसेच नागरिकांना धमकावत असल्याचं समोर आलंय. या गुंडांचा चांगलाच बंदोबस्त करा,अशी मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका टोळक्याने सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला करून गंभीर जखमी केले होते. (Pune police)
या गुंडगिरी विरोधात जनमत संतप्त होऊन सोशल मीडियावर या गुंडाचा बंदोबस्त करा, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. यामुळे पुणे पोलिसांना कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या गुंडांना ताब्यात घेऊन पुणे पोलिसांनी त्यांना असा झटका दिला आहे की, आता या गुंडांना चालणे मुश्किल झाले आहे. (Pune police)
दरम्यान, आरोपींना पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात आणले असता, पोलिसांनी त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना ठाण्यात नेले. तसेच त्यांची रस्त्याने वरात काढली.
यापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिस आता कोयता गँगच्या मागे हात धुवून लागले आहेत.
सदर गुंडांच्या वरातीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.