Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : गणेश मुर्तीचे रंगकाम अंतिम टप्यात कुरुळी येथे मुर्ती कारागीरांची लगबग

ALANDI : गणेश मुर्तीचे रंगकाम अंतिम टप्यात कुरुळी येथे मुर्ती कारागीरांची लगबग

आळंदी / अर्जुन मेदनकर : गणेशाच्या आगमनाला पंधरा दिवस राहिले असुन कुरुळी परीसरातील मर्ती कारागीरांची रंगकाम उरकण्याची घाई दिसुन येत आहे. येथे शाडु मातीच्या गणेश मुर्तीनां मागणी सर्वात अधिक आहे. या शाडु मातीचे विघटन लवकर होते म्हणुन मुर्तींची मागणी आहे असे ओम साई आर्टसचे मुर्तीकार लाला जगताप यांनी दिली. (ALANDI)

तसेच प्लास्टर ॲाफ पॅरीसच्या गणेश मुर्ती असुन ही त्या आकर्षक आहेत. शाडु मातीच्या गणेश मुर्ती सुध्दा आकर्षक, सुंदर, आखीव आहेत. कुरुळीतील गणेश मुर्ती पिंपरी चिचंवड, मोशी, आळंदी, चिखली, केळगाव, चिंबळी, मोई, निघोजे, चाकण, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, बिरदवडी, खराबवाडी, खालुंब्रे, येलवाडी, देहू कुरुळी या परीसरात विक्रीसाठी जातात. गणेश मुर्तीवर रंगकामाचा अंतिम हात फिरवला जात आहे. पार्थिव गणेश स्थापनेला अवघे बारा दिवस राहिले आहेत. गणेश मुर्तींची मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्र दिवस रंग काम चालु आहे. (ALANDI)

गणेश मुर्ती बनवण्याचे काम हे मे महिन्यापासून चालु आहे. गणेश मुर्तींना रंगकाम केमिकल विरहित आहे. नैसर्गिक रंगांचा वारर केलेला आहे. गणेश मुर्तींना हिरेजडित असा फेटा मुकुटावर बांधण्यात आलेला आहे. यामुळे मुर्तीला देखणे रुप प्राप्त झाले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय