Thursday, March 20, 2025

बसवजयंतीच्या पार्श्वभूमीवर “वसता एकोभाव” या मराठी वचन गीताचे होणार प्रसारण

 

कोल्हापूर : म.बसवण्णांच्या वचनांवर आधारित “तूच जगाचा सांगाती” या अल्बम मधील “वसता एकोभाव” हे पाचवे वचन-गीत २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ वाजता Tinos music india या युट्युब चॅनेलद्वारे तसेच विविध १५० समाज माध्यमांवर ऑनलाईन स्वरूपात प्रसारित होत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम प्रल्हाद जाधव यांच्या सुमधुर आवाज या गीताला लाभला आहे.  

बसवण्णांचे मूळ कन्नड वचन असलेल्या या गीताची भावानुवादीत रचना बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक तथा शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टुडिओचे ओंकार सुतार यांनी संगीत संयोजन व ध्वनिमुद्रण केले आहे. सेव्हन सेकंदस् क्लेक्टीव्ह फिल्मस् चे प्रसाद महेकर यांनी दिग्दर्शन व संकलन आणि प्रशांत सुतार यांनी छायाचित्रण केले आहे. या गीतासाठी निर्मिती संयोजन यश आंबोळे यांनी केले आहे. टीनॉस म्युझिक इंडिया हे या गीताचे अधिकृत प्रसारक आहेत. कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र, कोल्हापूर हे प्रायोजक आहेत.

DYFI राज्य अध्यक्षपदी नंदकुमार हडळ तर राज्य सचिवपदी बालाजी कलेटवाड

3 मे रोजी महात्मा बसवण्णा यांची जयंती आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारित होणारे हे बसव वचन गीत निश्चितच सर्व मराठी रसिकजनांसाठी सांगीतिक पर्वणी ठरणार आहे. महात्मा बसवण्णांच्या वचनांचा आशय प्रामुख्याने सामाजिक स्वरूपाचा, कालोचित असा परिवर्तनशील दृष्टीचा आहे. त्यांच्या महत्वपूर्ण वचनांचे आधुनिक माध्यमांशी सुसंगत असे माध्यमांतर करण्याच्या सर्जनात्मक कल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचा प्रकल्प कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेने हाती घेतला आहे. महात्मा बसवण्णांच्या निवडक वचनांच्या मराठी भावानुवादाचा दृकश्राव्य स्वराविष्काराच्या रूपाने माध्यमांतर सध्या केले जात आहे. बसवादी शरणांच्या वचनांचे मराठीत प्रथमच असे माध्यमांतर होत आहे. आजवर या दृकश्राव्य अल्बम मधील चार गाणी युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरसह विविध दीडशे प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाली आहेत. या सर्व गाण्यांना रसकीप्रेक्षकांचा आणि बसव-अनुयायिंचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

अखेर जगातील ‘या’ श्रीमंत व्यक्तीने 44 अब्ज डॉलर्समध्ये केली ट्विटरची खरेदी

राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर उपाय केले पाहिजेत – सर्वपक्षीय बैठकीत माकपची मागणी

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles