बार्शी : दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा जत्था बार्शी मध्ये दि. 2 जानेवारी 2021, शनिवार रोजी दुपारी 1 वाजता येणार आहे.
हा जत्था अ.भा. किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. नामदेव गावडे यांचे नेतृत्वाखाली कोल्हापूर वरून निघून सांगली, सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर मार्गे राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीकडे निघाला आहे. बार्शीत या जत्थाचे स्वागत शाहीर अमर शेख चौक, जुने पोलिस स्टेशन बार्शी येथे सर्व पक्ष संघटना समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
त्यानंतर हा जत्था चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तेथे सभा होऊन त्याच्या स्वागताचा कार्यक्रम समाप्त होणार आहे.
दरम्यान, दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी शेतकरी शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. तानाजी ठोंबरे यांनी केले आहे.