Tuesday, March 18, 2025

महाराष्ट्र ॲग्रो ची फळे व भाजीपाला निर्जलीकरण कार्यशाळा बारामतीत संपन्न !

 

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

बारामती : येथे यशस्विनी अन्न मूल्यवर्धन या विषयावर बचत गट महिलांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .हा कार्यक्रम 9 ते 11 मे 2022 रोजी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि अटल इंनोवेशन सेंटर बारामती यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून प्रत्येक जिल्ह्यातून दोन महिलांची निवड करण्यात आली आहे .या महिला आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन कार्यरत असणाऱ्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना मार्गदर्शन करतील.

या कार्यशाळेमध्ये विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे जसे की कांदा लसूण डीहायड्रेशन प्रक्रिया, महिला बचत गटांसाठी शासकीय अनुदान ,हळद निर्मिती प्रक्रिया ,मध निर्मिती प्रक्रिया, पॅकेजिंग, प्रोडक्शन, स्टोरेज ,भरडधान्य उत्पादने , दुग्ध व्यवसाय आणि डेरी प्रॉडक्ट ,प्रात्यक्षिकांसह क्षेत्रभेटी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत फळे व भाजीपाला निर्जलीकरण सत्रा अंतर्गत महाराष्ट्र ॲग्रो चे युवा उद्योजक रोहन थोरात व रत्नदीप सरोदे यांनी कांदा आणि लसूण निर्जलीकरण प्रक्रिया विषयी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अटल इंनोवेशन सेंटरच्या जया तिवारी मॅडम,व्यवस्थापक काळे सर,सस्ते मॅडम, कृषी विज्ञान केंद्राचे यशवंत जगदाळे सर आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles