Friday, December 27, 2024
Homeराज्यपेसा ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांसाठी खुशखबर ! बहुरंग तर्फे 'पेसा' पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविण्याचे...

पेसा ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांसाठी खुशखबर ! बहुरंग तर्फे ‘पेसा’ पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवहान

पुणे : राज्यात लागु असलेल्या ‘पेसा’ कायद्याची उत्तम अंमलबजावणी करुन ‘ग्रामसभा’ सक्षम करणाऱ्या ग्रामसेवकासाठी ‘बहुरंग’, पुणे तर्फे “पेसा पुरस्कार” देण्यात येणार असल्याची माहिती बहुरंग संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी दिली आहे. तसेच पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवहान देखील केदारी यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी सन २०१ ९ -२०२० हे कामकाजाचं वर्ष मानलं आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह असे असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. 

२१ एप्रिल २०१५ चा शासन निर्णय तथा मार्गदर्शक तत्त्वा प्रमाणे पेसा ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या ५ % अबंध निधीमधून शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे केलेल्या विकास कामांचा दस्तऐवजचा प्रस्तावात समावेश असावा. ग्रामसभा सक्षम करण्यासाठी राबविलेले उपक्रम, पेसा व वन हक्क जनजागृती तसेच आदिवासी रुढी, परंपरा, कला, संस्कृती यांचे संवर्धन अंतर्गत केलेले ‘दृकश्राव्य’ दस्तऐवज याचाही पुरस्कारात विचार केला जाणार आहे. प्राप्त प्रस्तावात दर्शविलेल्या कामाची शहानिशा आणि सत्यता ‘बहुरंग’ निवड समितीकडून तपासून अंतिम निवड केली जाईल. 

तरी पेसा ग्रामपंचायती मधील ग्रामसेवकांनी आपला प्रस्ताव १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावा. 

संपर्क : अध्यक्ष ‘ बहुरंग ‘ पुणे. पत्ता : २४ / ५९९ , पावन सहकारी हौसिंग सोसायटी, गोखलेनगर, पुणे ४११०१६. फोन ०२०-२५६५० ६२५, मोबाईल : ९४२२३१८३१८.


संबंधित लेख

लोकप्रिय