Friday, December 6, 2024
Homeराज्यप्रल्हाद कांबळे मारहाण प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

प्रल्हाद कांबळे मारहाण प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश


कृष्ण प्रकाश यांच्या आश्वासना मुळे १ मे चे आंदोलन स्थगित : बाबा कांबळे

पिंपरी चिंचवड : कष्टकरी कामगार पंचायतचे नेते प्रल्हाद कांबळे व त्यांची पत्नी रुक्मिणी कांबळे यांना मारहाण करून प्रल्हाद कांबळे यांच्या विरोधात ३५३ व ३५४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, या प्रकरणी पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्या मुळे आणि 353 चा दुरउपयोग होत असले बाबत पिंपरी-चिंचवड शहरातील फुले-शाहू-आंबेडकर वादी पक्ष संघटना, कष्टकरी संघटना , व सर्व पक्षीय  घटनेचा वतीने या घटनेच्या निषेधार्थ १ मे २०२१ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय वर सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

परंतु पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त  श्रीकृष्ण प्रकाश यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रल्हाद कांबळे मारहाण प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच जॉईन कमिशनर रमानाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त  सुधीर हिरेमठ यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करू असेे सांगितले. त्यामुळे १ मे रोजी निघणारा सर्वपक्षीय मोर्चा रद्द करण्यात आला असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिक युवा मोर्चा अध्यक्ष राहूलजी डंबाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर सुरेश निकाळजे, बहुजन सम्राट सेना अध्यक्ष संतोष निसर्गंध, भीमा-कोरेगाव संघर्ष सामाजिक समितीच्या अध्यक्षा अनिता सावळे हे उपस्थित होते.

यावेळी राहुल डंबाळे म्हणाले, ३५३  या कलमाचा सरकारी बाबु कडून दुरउपयोग होत असून हे कलम रद्द करावे यासाठी पुढील काळात महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरवठा करणार आहे.

तर संतोष निसर्गंध म्हणाले, कृष्ण प्रकाश यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत. तर यापुढील काळात सरकारी अधिकारी यांनी ३५३ कायद्याचा दुरउपयोग केल्यास शहरातील सर्व संघटना यापुढेही एकत्र येतील या आंदोलनासाठी एकत्र आलेल्या सर्व संघटनांचे आभार व्यक्त करतो, असे सुरेश निकाळजे म्हणाले.

 प्रल्हाद कांबळे यांंच्यावरील कारवाईचा माजी नगरसेवक मारुती भापकर, मानव कांबळे, काशिनाथ नखाते, क्रांतीकुमार कडूलकर, गणेश दराडे यांनी देखील निषेध केला होता. 

तसेच मोर्चामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चा नेते राहुल डंबाळे, रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया शहर अध्यक्ष सुरेश निकाळजे, रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजिज शेख, कष्टकरी कामगार पंचायत बळीराम काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महासचिव ज्ञनेश्वर कांबळे, बहुजन सम्राट सेना अध्यक्ष संतोष निसर्गंध, भिमा-कोरेगांव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साळवे, सामाजिक कार्येकर्त्या अंजना गायकवाड, राष्ट्रवादी कॉग्रेस सफाई कामगार विभाग प्रदेश सचिव युनूस पठाण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रुप अध्यक्ष सतीश कदम, भारतीय लहुजी पँथर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अक्षय दुनघव, सह पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पक्ष संघटनांनी पाठींबा दिला होता.


संबंधित लेख

लोकप्रिय