Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर...

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

Anil Navgane : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर (Anil Navgane) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात अनिल नवगणेंवर थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर टेमपाले ते वीरच्या दरम्यान गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात चालक किरकोळ जखमी झाला. हा हल्ला रात्री 10.30 च्या सुमारास झाला आहे. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी पुढे पळवली. या कार हल्ल्यामध्ये अनिल नवगणे हे थोडक्यात बचावले पण त्यांचा चालक जखमी झाला. या हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान झाले आहे.

अनिल नवगणे यांच्या हल्ल्यानंतर रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा आरोप करण्यात आलं आहे. नवगणेंवर यांच्यावर शिंदे गटाने हल्ला केलाचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर रात्री उशिरा अनिल नवगणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र हा हल्ला का केला? व कोणी केला…तसेच यामागे काही राजकीय हेतू होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉफ्टर क्रॅश

MPSC च्या रखडलेल्या तारखांबाबत मोठी अपडेट, वाचा !

मोठी बातमी : राहुल गांधींना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर

‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

संबंधित लेख

लोकप्रिय