Saturday, April 12, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Praniti Shinde : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

Praniti Shinde : काँग्रेसने गुरुवारी लोकसभेसाठी तिसरी यादी जाहीर केली. या यादीत प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रणिती शिंदे गावभेट दौरे करत सोलापूर जिल्हाभर विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहे. या दौऱ्या दरम्यान प्रणिती शिंदे त्यांच्या कारवर हल्ला झाला आहे.

---Advertisement---

मिळालेल्या माहितीनुसार, प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत सरकोली गावात पोहोचल्या. त्यावेळी प्रणिती शिंदेच्या गाडी अडवण्यात आली. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिंदे यांच्या वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला.

दरम्यान, भाजपच्या कार्यकत्यांनी कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. या आरोपानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

---Advertisement---

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, काही गावात मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी आहे. त्या आंदोलनाचा मी आदर करते. पण भाजपची लोक आंदोलनाचं नाव घेऊन पुढे येत आहेत. या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर आणि कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कार फोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे. ते आंदोलक नसून भाजपचे कार्यकर्ते होते. आम्ही त्याचा निषेध करतो. या घटनेची मनोज जरांगे यांनीही नोंद घ्यावी, असे त्या पुढे म्हणाल्या.

whatsapp link

हे ही वाचा :

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles