वडवणी (लहू खारगे) : वडवणी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र लोकमान्य टिळक महाविद्यालय येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
अभ्यास केंद्रात वैभवशाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, समाज सुधारक, कृषी तज्ञ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष पंजाबकाका मस्के पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी अभ्यास केंद्राचे कार्यवाह अमरसिंह मस्के पाटील, वडवणी पोलीस स्टेशनचे ढाकणे, केंद्रसंयोजक डॉ. गोविंद पांडव, सहकेंद्रसंयोजक प्रा. गंगाधर घोडेराव, समंत्रक प्रा. अशोक खेत्री, प्रा. सुधीर पोकळे, डॉ. रामहरी माळकर, डॉ. देविदास दडपे, डॉ. भालचंद्र कुलकर्णी, प्रा. गोपीचंद घायतिडक, प्रा. विठ्ठल तंबूड, प्रा. गोपाळ मस्के, तांत्रिक सहाय्यक पंकज कुमार दुबे, कार्यालयीन प्रमुख प्रशांत पवार व विद्यार्थी उपस्थित होते.