Tuesday, July 23, 2024
Homeग्रामीणघोडेगाव : महिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग...

घोडेगाव : महिला दिनाचे औचित्य साधत ठाकरवस्तीत सुरू झाला प्रौढ साक्षरता वर्ग…

घोडेगाव / आनंद कांबळे : महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब कोथरूड पुणे यांच्या सहकार्याने व आदिम संस्थेच्या स्थानिक संयोजनातून आमोंडी येथील ठाकरवाडीत प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आले. या साक्षरता वर्गाचे उद्घाटन स्वयंसेविका, शारदा केदारी यांचा सत्कार फळा व खडू देऊन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

आमोंडी येथील ठाकरवाडीतील अनेक स्त्रियांना शिक्षण घेता आलेले नाही त्यामुळे त्या निरक्षर असल्याने दैनंदिन व्यवहारांत अनेक वेळा दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. यावर उपाय म्हणुन प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना पाटी, पेन्सिल तसेच साक्षरता वर्गासाठी आवश्यक ते साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सत्यजित चितळे, त्यांचे सहकारी उज्वल तावडे, प्रताप रेगे, प्रशांत सिद्ध, मनीष दिडमिशे, वसंत कुलकर्णी, सुहर पटवर्धन, आदिम संस्थेचे राजु घोडे, अविनाश गवारी, अर्जुन काळे, सुभाष पारधी आदी यावेळी उपस्थित होते.

या साक्षरता वर्गात लेखन, वाचन, अंकगणित याबरोबरच कायदा साक्षरता, आर्थिक साक्षरता, संविधान साक्षरता व आपत्ती व्यवस्थापन साक्षरता याविषयी ही माहिती या वस्तीपातळीवर देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गवारी व आभार प्रदर्शन अर्जुन काळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे स्थानिक नियोजन अनिल सुपे, सुभाष पारधी, अजित पारधी, शारदा केदारी, सुवर्णा जाधव यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय