Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदिव्यांगांच्या उन्नतीसाठी कला व क्रिडा विषयक उपक्रम राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार -...

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी कला व क्रिडा विषयक उपक्रम राबवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार – सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट

पिंपरी चिंचवड : महापालिका दिव्यांगांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते याबरोबरच दिव्यांगांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्य तसेच नेत्र तपासणी गरजेची आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत आगामी काळात दिव्यांगांच्या कला व क्रिडा गुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले.

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे, एच.व्ही.देसाई रुग्णालय, पुणे व अभिसार फाउंडेशन, वाकड यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवड्यानिमित्त दिव्यांग विद्यार्थी, पालक व जेष्ठ नागरिकांसाठी वाकड आयोजित नेत्र तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी दांगट बोलत होते.

यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक रमेश मुसुडगे, अशोक सोळंके, दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे, दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील अभ्यासक नंदकुमार फुले, अभिसार फाउंडेशनच्या अध्यक्षा मिनिता पाटील, उपखजिनदार कल्पना मोहिते, एच. व्ही. देसाई रुग्णालयाच्या डॉ.शशी पाटील, डॉ.विद्या साठे यांचेसह दिव्यांग विद्यार्थी, पालक तसेच जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी केले. सूत्रसंचालन खेडेकर मॅडम यांनी केले. या शिबिरात ७५ जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. रमेश मुसुडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय