Thursday, April 25, 2024
HomeNewsशाहिद भगतसिंग जयंती विशेष लेख:" ए भगतसिंह तू जिंदा है" !

शाहिद भगतसिंग जयंती विशेष लेख:” ए भगतसिंह तू जिंदा है” !


स्वतंत्र भारतासाठी हजारोंनी बलिदान दिले अर्थात त्या सर्वांचे आपण आजही ऋणी आहोत, पण त्यातही भगतसिंह यांचे नाव विशेष लक्षात राहते कारण वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ते देशासाठी फाशीवर चढले होते.मोडेन पण वाकणार नाही या उक्तीला समर्पक असे ज्यांचे काम होते.


भगतसिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 चा आहे, पाकिस्तान (तत्कालीन हिंदुस्थान) ल्यालपूर येथे त्यांचा जन्म झाला होता, भगतसिंह जहाल मतवादी होते, त्यामुळे सरकारी शिक्षण किंवा चाकरी करणे त्यांनी कधीही स्वीकारले नाही.


उलट वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षापासून ते विविध आंदोलनात सहभागी होऊ लागले, 1926 मध्ये म्हणजेच 19 व्या वर्षी त्यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली होती, हिंदुस्तान सोशलिस्ट पार्टीचे ते सदस्य होते. भगतसिंह यांची आज 115 वी जयंती आहे. याच निमित्ताने या थोर देशप्रेमी आणि महान स्वातंत्र्यसैनिकाचे विचारांच्या धन लूटू या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय