Thursday, December 12, 2024
Homeविशेष लेखन्यायाच्या प्रतीक्षेत आशा वर्कर - संध्या पाटील

न्यायाच्या प्रतीक्षेत आशा वर्कर – संध्या पाटील

अबालवृद्धांची काळजी घेणारी प्रसंगी आपल्या हातातलं घास सोडून सामाजिक कर्तव्य बसजवणारी आशा हि आशेवरच.

ग्रामीण भागात १ हजार लोकसंख्येत ० ते १०० वर्ष  वयोगतील तळागाळातील लोकांना आरोग्याबाबत  समुपदेशन करून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशाच्या पदरी मात्र नेहमी निराशाच येते. आशाताई हि गावात १ हजार लोकसंख्येत काम करीत असते. काम करत असताना तिला आर्थिक सामाजिक कौटुंबिक व कधी कधी कार्यालयीन समस्येला तोंड देऊन काम करावे लागते. ६ महिन्याच्या बालकांना आयर्न फॉलिक ऍसिड देणे व आहार समुपदेशन यामुळे बालक अनेमिया मुक्त होतो. तसेच ११ ते २० वयोगतील किशोरवयीन मुले आणि मुली यांच्या सभा घेऊन त्यांना आरोग्य बाबत जागृती करणे व आयर्न फॉलिक ऍसिड पुरवणे. तसेच गरोदर माता असो की रजिनिवृत्तीच्या समस्या असो सर्व महिला आशाताईकडे कुटुंबातील सदस्य समजून सांगतात.

आशा हि एक सशक्त समाज घडवणारी आरोग्य यंत्रणेचा दुवा आहे

गर्भनिरोधक साधने, टि.बी. कुष्ठरोग साथरोग हि सर्व काम ती करत असते. पूर्वी हि सर्व काम नर्स करत असे. आता मात्र ती महिन्यात १ दिवस लसिकरणासाठी गावात येते. परंतु तिला ४० हजार वेतन व भत्ते लागू आहे.

माझी आशाताई मात्र एवढं मोलाचं काम करून खपते, मोबदल्यावर. नुकत्याच झालेल्या वाढीमुळे लोक २ हजार चे मूल्य मापन करतात. पण ती असल्यामुळे किती लोकांच्या कामाचा  शभार कमी झाला याची साधी कुणी कारण मीमांसा जाणून घेत नाही.

त्यात कोरोना सर्वेक्षणमध्ये काहींना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यात त्यांना किती सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे पण साधी कौतुकाची थाप कुणी देत नाही. आम्हाला तुकड्या तुकड्यात नव्हे तर कायम स्वरूपी वेतन द्या, जस केरळ मध्ये, तेलंगणामध्ये, दिल्लीमध्ये, मध्यप्रदेशमध्ये आहे. या राज्याकडे पैसा आहे, मग महाराष्ट्र शासनाकडे नाही का? 

आशा हि सशक्त समाज निर्मितीचा मजबूत पाया, आरोग्य यंत्रणेचा चौथा खांब, आरोग्य दूत आहे. म्हणून ती अजून हि न्यायच्या प्रतीक्षेत आहेत, “हमे सन्मान से जिना है”,  “आशा है हम सबकी, “पर आशा हि निराश है!”

✍ संध्या पाटीलअकोला

संबंधित लेख

लोकप्रिय