Thursday, December 26, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांना कामाचा अतिरिक्त ३०० रुपये मोबदला देण्यात यावा, सिंधुदुर्ग जिल्हा...

आशा व गटप्रवर्तकांना कामाचा अतिरिक्त ३०० रुपये मोबदला देण्यात यावा, सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन ची मागणी

सिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तकांना कामाचा अतिरिक्त ३०० रुपये मोबदला देण्यात यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सिटू) च्या सचिव विजयाराणी पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, “आपला सिंधुदुर्ग, आपली जबाबदारी” या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरीकांचा घरोघरी जाऊन ऑक्सीजन व तापमान तपासण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतला आहे. ही तपासणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर्स यांना देण्यात आलेली आहे. परंतु आशा व गटप्रवर्तकांना राबवून घेतले जात आहे, परंतु मोबदल्याचा विचार केला जात नसल्याचेही विजयाराणी पाटील यांनी म्हटले आहे.

आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

१. “आपला सिंधुदुर्ग, आपली जबाबदारी” या मोहिमेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निधीमधून  आशाना अतिरिक्त प्रतिदिन तीनशे रुपये मोबदला देण्यात यावा. यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये राज्य शासनाने अशा तपासणीसाठी अतिरिक्त मोबदला दिलेला होता, त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषदेने हा अतिरिक्त मोबदला द्यावा.

२. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना चे पेशंट वाढत असल्याने आशाना संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे त्यांना संसर्ग झाल्यास त्यांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.

३. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील विरळ लोकवस्ती व मे महिन्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रतिदिन ५० कुटुंबाची तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे प्रतिदिन ठराविक कुटुंब तपासणीची सक्ती रद्द करावी.

४. नागरिक नोंदणी, अहवाल लेखन, तापमान तपासणी, ऑक्सीजन तपासणी व सल्लामसलत एका आशा वर्करने करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या सोबत तपासणीसाठी आणखी दोन स्वयंसेविका द्याव्यात. 


संबंधित लेख

लोकप्रिय