Junnar/ आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील बीट आपटाळे मधील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांची सहविचार सभा बीटच्या विस्तार अधिकारी संचिता अभंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी तेजूर येथे संपन्न झाली. (Junnar)
सदर सहविचार सभेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा पूर्वतयारी, शालेय गुणवत्ता विकास, वर्ग सजावट, शिक्षक सुसंवाद, विद्यार्थी सहशालेय उपक्रम, प्रत्येक शाळेचे किमान दहा वेगवेगळे उपक्रम, अभिलेखे कशाप्रकारे अद्ययावत करावेत, कला क्रीडा स्पर्धा मधील सहभाग वाढवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतचे शैक्षणिक कामकाज नियोजन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, लोकसहभाग, शालेय वर्ग मंत्रिमंडळ, आपत्ती व्यवस्थापन, शालेय परसबाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. (Junnar)
बीट मध्ये प्रत्येक शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावेत, तसेच शालेय भौतिक सुविधा, अभिलेखे अद्ययावतीकरण, शालेय व विद्यार्थी गुणवत्ता या तीनही बाबी शालेय विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असून शालेय शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून विस्तार अधिकारी यांनी विविध बाबींची चालू शैक्षणिक वर्षांमध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
बीट मधील जे शिक्षक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यामध्ये ठाकरवाडी तेजूर शाळेचे मुख्याध्यापक आनंदा मांडवे, इंगळून शाळेचे उपशिक्षक किसन बांबळे यांचा बीट च्या वतीने सेवापुर्ती निमित्त सन्मान करण्यात आला. (Junnar)
मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल सर्व शिक्षकवृंद यांचा सन्मान करण्यात आला. तसेच तालुकास्तरीय कला क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल व इंगळून शिक्षकवृंद यांचाही सत्कार करण्यात आला. विविध सहशालेय उपक्रम राबवणारी तसेच मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव शिक्षकवृंद यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सचिन नांगरे यांनी तर प्रास्ताविक तानाजी तळपे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक आनंदा मांडवे यांनी उपस्थितांना शालेय रेकॉर्डबाबत मार्गदर्शन केले. लक्ष्मण कुडेकर, कविता वारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व शिक्षकांना स्नेहभोजनाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती ठाकरवाडी तेजूर यांनी केले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर दुधवडे यांनी आभार मानले. अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात ही सहविचार सभा संपन्न झाली. सहविचार सभेसाठी केंद्रप्रमुख सुरेश भवारी, पुष्पलता पानसरे, संतोष चिलप, विशेषतज्ज्ञ सुदेश तोरकडी, विशेष शिक्षिका रोहिणी गडदे, विविध शिक्षक संघटना पदाधिकारी खंडेराव ढोबळे, सरचिटणीस शिक्षक संघ सुभाष मोहरे, अखिल जिल्हाध्यक्ष पुणे रमेश सावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब लांघी, कार्याध्यक्ष समिती मुख्याध्यापक पुनम तांबे, जयसिंग मोजाड, नानाभाऊ शेळकंदे, सुमन जढर, सुनील घोलप व बीटमधील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.


हे ही वाचा :
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या
स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी
ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !
ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार
मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ
ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक
मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता