Monday, December 23, 2024
Homeग्रामीणआंबेगाव : आदिम संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी !

आंबेगाव : आदिम संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी !

आंबेगाव (पुणे) : शिवजयंती निमित्ताने आदिम संस्था घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

यावेळी बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगावचे माने, शासकीय आश्रम शाळा गोहे बुद्रुक चे माजी मुख्याध्यापक कारले, किसान सभेचे तालुका उपाध्यक्ष राजू घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे सत्कार एक पुस्तक व पेन देऊन माने  यांचा सत्कार अविनाश गवारी, कार्ले सरांचा सत्कार पुंडलिक असवले व पुंडलिक असवले यांचा सत्कार गणेश काटळे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सुपे यांनी केले.

 

माने म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कशा पद्धतीने रेखाटले जाते आणि सोशल मीडियातून आलेल्या माहितीची शहानिशा करून सत्यता पडताळणी केली जाते का यावर दृष्टिक्षेप टाकला. इतिहासाचे वेगवेगळ्या संदर्भातून शिवाजी समजावून सांगण्याचा तसेच शिवाजी महाराजांच्या विचारांना मनात रुजवण्याचा मोलाचा संदेश दिला. यानंतर कारले सर यांनी तब्येत ठीक नसल्याने कार्यक्रमाला पुढे चालू ठेवण्यासाठी संमती दिली. यानंतर कॉम्रेड राजू घोडे यांनी शिवाजी महाराजांच्या मूल्यवर्धित विचारांना अनुभवातून सिध्द करत ती मूल्य पुढे घेऊन जाण्याचे सर्व घटकातील जनतेला आव्हान केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर खुली चर्चा करण्यात आली. यामध्ये वास्तविक स्थिती, जल्लोषबाजी आणि विचार यांचा आढावा घेतला गेला.

 

कार्यक्रमाचे आभार अविनाश गवारी यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गाडेकर यांनी केले. यावेळी DYFI चे गणेश काटळे, किसान सभेचे पुंडलिक असवले, SFI चे सुशीला भोकटे, साथी संस्थेच्या अर्चना गवारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय