Thursday, December 26, 2024
Homeकृषीआंबेगाव : आपटीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात; लोकांना मिळालं गावातच काम

आंबेगाव : आपटीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात; लोकांना मिळालं गावातच काम

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील आपटी या गावात रोजगार हमी योजने अंतर्गत आपटी ते जुन्नर शिव या रस्त्याच्या कामाचे उदघाटन होऊन कामाला सुरुवात झालेली आहे. यापुर्वी लोकांना डोंगर उतरून दुसऱ्याच्या बांधावर अत्यल्प मजुरीने कामावर जावे लागत होते. 

मात्र आता गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोजगार हमी कायद्या अंतर्गत गावातच काम सुरू होण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून युवकांच्या ग्राम विकास समितीचे कार्यकर्ते, स्थानिक जनता किसान सभेच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील होते.

या साऱ्या प्रयत्नांमुळे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत  गावात स्मशानभूमी, विहीर व जुन्नर शिव यांना जोडणारे ३ रस्ते तसेच वनविभागात सलग समतल चर इ. कामे सेल्फवर असून या कामातून लोकांना पुढील ३-४  महिने रोजगार मिळणार आहे.

यावेळी सरपंच राजु गाडेकर, ग्रामसेविका नंदकर, ग्रामपंचायत सदस्या भामाबाई गवारी, तांत्रिक अधिकारी रेडेकर सर, कृषी सहायक उगले तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. उदघाटनाच्या समारोपात स्थानिक जनतेला प्रशासनाने सहकार्यातून रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच ‘अबकी बार सिर्फ रोजगार’हे डॉ. अजित अभ्यंकर यांचे पुस्तक भेट देऊन आपटी ग्राम विकास समिती व SFI पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, सचिव दत्ता गवारी, उपाध्यक्ष संदिप गवारी यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.

संबंधित लेख

लोकप्रिय