Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : मरकळ गादी कारखान्यास आग, दोन ट्रकसह एक पिकअप जळाला

ALANDI : मरकळ गादी कारखान्यास आग, दोन ट्रकसह एक पिकअप जळाला

वित्त हानी प्रचंड; सुदैवाने जीवित हानी नाही

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील मरकळ मधील मरकळ आळंदी (Alandi) रस्त्यावरील पाण्याचे टाकी जवळील व्यावसायिक जयसिंग रामभाऊ लोखंडे यांच्या लोखंडे गादी कारखान्यास शुक्रवारी ( दि. ३ ) आग सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली.

या आगीत दोन ट्रक सह एक पिकअप आणि पत्राशेड कारखान्याचे आतील साहित्य आणि माल आगीत जळाल्याने प्रचंड वित्त हानी नुकसान झाली. मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही. Alandi news

मरकळ कारखान्यातील आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. या आगीची घटना समजताच आळंदी पोलिस अधिकारी, कर्मचारी, आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी आज विझविण्याचे काम सुरू केले आहे.

आग विझविण्यास मरकळ येथील घटनास्थळी आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड (pcmc) महानगर पालिका व पुणे पीएमआरडी च्या अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. Alandi news

घटनास्थळी परिसरात आग आटोक्यात आणण्यास सुमारे अडीच तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आतील गॅस सिलेंडर तात्काळ सुरक्षित बाहेर काढल्याने अधिकचा अनर्थ टळला.

या लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी आग वीजविण्यास गर्दी करून मदत केली.

या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे समजते. मात्र गादीचा कारखाना या आगीत जळून खाक झाला. यात पत्रा शेडसह आतील माल व कारखान्याचे लगतच्या गाड्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. Alandi news

संबंधित लेख

लोकप्रिय