लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी (ALANDI)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात इंदिरा एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट श्रींचे गाभाऱ्यात करण्यात आली होती. लाखावर भाविकांनी दर्शनास गर्दी करून श्रींचे दर्शन घेतल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. (ALANDI)
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात इंदिरा एकादशी निमित्त खिचडी महाप्रसाद आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले.
आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन करीत स्थान माहात्म्य जोपाले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद, महानैवेद्य झाला. विणा मंडपात देहूकर महाराज यांचे वतीने गणेश महाराज साळुंखे यांचे हरिकीर्तनसेवा मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून झाली.
कीर्तनास भाविकांनी गर्दी केली.
अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन, पत्रकार, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, विद्या आढाव, अनिता शिंदे, उषा नेटके, चारुशीला पोटफोडे, राधा घुंडरे, शोभा फासगे, कल्याणी मालक, राणी वाघ, पार्वती गव्हाणे, शोभा कुलकर्णी, माजी नगरसेविका उषाताई नरके, लता वर्तुळे, नंदा महाडिक, अरुणा जगताप, सुनीता माने, रेखा मनुरे, उज्वला जुमले, अश्विनी धोटे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, राजेश नागरे, सोमनाथ बेंडाले, सरपंच विजय सुतार, माऊलींचे मानकरी गणपत कुर्हाडे पाटील, राजेंद्र जाधव आदीं सह मोठ्या संख्येने महिला, आळंदीकर ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी हरित आळंदीसाठी जनजागृती करण्यात आली. इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले