Saturday, November 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आषाढी यात्रे निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता; इंद्रायणीची आरती

ALANDI : आषाढी यात्रे निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता; इंद्रायणीची आरती

आळंदी / अर्जुन मेदनकर : तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करण्यात आली. (ALANDI)

इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात करून आषाढी वारी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाटावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. (ALANDI)

यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, माजी नगरसेविका उषा नरके, राजश्री बेंडाले, कल्याणी माळवे, शोभा कुलकर्णी, निकिता चौधरी, उषा ननवरे, अनिता शिंदे, राणी वाघ, लताई शेवते, सारिका मेदगे, नीलम कुरधोंडकर, मंगल वहिले, शोभा वहिले, त्रिवेणी उबाळे, बेबी वहिले, ईश्वरी शिर्के, शालन होनावळे, उषा ननवरे, सविता कांबळे, शुभांगी यादव, लता वर्तुळे, ताई सरोदे, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, सोमनाथ बेंडाले, गोविंद ठाकूर तौर, कांताराम घुंडरे पाटील, राजेश नागरे, महादेव पाखरे आदींसह मोठ्या संख्येने महिला आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. (ALANDI)

इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे यांनी केले आहे. (ALANDI)

तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय